
अमळनेर: अमळनेर ते पाडळसरे बस वेळेवर नसल्याने बस उशिराने येत असल्याने व रात्रीची बस बंद झाल्याने विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत आहेत.

अमळनेर आगारातून फक्त सकाळीच ९.३० वाजता सुटणारी बस तब्बल दोन तास उशीरा आली. व खाली फिरून गेली तर सायंकाळी येणारी एकमेव असलेली बस फेरी बंदच करण्यात आल्याचे विद्यार्थी सांगतात, सायंकाळी येणारी बसफेरी होतच नसल्याने विद्यार्थी व पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनी वर व महिला प्रवाशांना लहान बालकांना कडेवर घेऊन ३ ते ४ कि.मी. अंतरावर पायपीट करत गेल्या दोन दिवसांपासून शाळा गाठावी लागत आहे. तर काहिंना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागला.तर तब्बल दोन तास वाट पाहून बहुतेक विद्यार्थ्यांची शाळाच बुडाली. सायंकाळी येणारी बस शाळा सुरु झाल्या. तरी बंदच करून अचानक न येणे याबाबत अमळनेर आगाराचा मनमानी कारभार सुरु असून उदघोषणा करणारे कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना बसेस पंढरपूर येथे गेल्याने ग्रामीण भागातील बहुतेक फेऱ्या अवेळी किंवा रद्द केल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना पासेस असल्यामुळे भाडे ही नसते त्यांची अवस्था केविलवाणी होऊन उसनवारी घेऊन शाळेत पायपीट करून गेलेल्या विद्यार्थ्यांवर वेळ आल्याने जबाबदार अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालावे नाहीतर पालकवर्ग आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे दिवसा शैक्षणिक कामासाठी महत्वाची असलेली पाडळसरेसाठी ही एकच बस फेरी असून ती ही वेळेवर धावत नसल्याने हाल झाले आहेत. अचानक सायंकाळी येणारी बस रद्द केल्याने विद्यार्थिनी, वृद्ध प्रवासी, लहान मुले सोबत असलेले प्रवासीवर्गाला पायपीट करावी लागत असुन बस वेळेवर येत नसल्याने पायी जाणे टाळून अनेक विद्यार्थ्यांवर शाळेत दांडी मारून शिक्षणाला मुकावे लागते. बस वेळेवर आल्यास विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होणार नाही. गैरसोय टाळून पाडळसरे बस वेळेवर पाठविण्यावर आगार प्रमुखांनी लक्ष घालण्याची मागणी पाडळसरे ग्रामवासियांकडून होत आहे.




