
अमळनेर:- आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष तसेच दि अंमळनेर को ऑप.अर्बन बँकेच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त दि. अमळनेर अर्बन बँक,जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सहकार विभाग जळगांव तसेच लायन्स क्लब,अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत समग्र आरोग्य तपासणी शिबिर ४ जुलै , शुक्रवार रोजी दि.अमळनेर को. ऑप्.अर्बन बँक पू.सानेगुरुजी पुतळा समोर,स्टेशन रोड,अमळनेर येथे आयोजित करण्यात आले आहे.

सदर भव्य मोफत समग्र आरोग्य तपासणी शिबिरात यावेळी नामांकित आरोग्य संस्थेतर्फे थायरॉईड प्रोफाइल च्या ३ चाचणी,किडनी प्रोफाइल च्या ७ चाचणी,पूर्ण रक्त चाचणी HbA1c च्या २ चाचणी, लिव्हर फंक्शन यकृतच्या ११ चाचणी , रक्त हिमोग्राम तपासणीCBCच्या २८ टेस्ट ,(lipid) लिपिड प्रोफाईल च्या ८ टेस्ट लोह चाचणी ,आयर्न स्टडीज च्या ३ चाचणी अशा विविध प्रकारच्या जवळपास ३५०० रुपये किंमतीच्या चाचणी तपासणी शिबिरात ४ जुलै शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता मोफत करून देण्यात येणार आहे.
तरी अमळनेर अर्बन बँकेच्या सर्व सन्माननीय सभासद , ठेवीदार,कर्जदार, ग्राहक व बँकेचे कर्मचारी,पिग्मी एजंट या सर्वांसह बँकेचे हितचिंतक लायन्स सभासद यांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अमळनेर अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे, व्हाईस चेअरमन रणजित शिंदे बँकेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ तसेच अमळनेर लायन्स क्लबचे प्रेसिडेंट डॉ.संदीप जोशी, सेक्रेटरी महेंद्र पाटील, ट्रेझरर नितीन विंचूरकर व सभासद यांचेसह बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी अमळनेर सहाय्यक निबंधक कार्यालय यांचे सहकार्य लाभत आहे.




