
अमळनेर -तालुक्यातील एकुण 119 ग्रामपंचायती मधुन सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत दिनांक 08 जुलै रोजी नगर परिषद सभागृह, नगर परिषद कार्यालय अमळनेर येथे दुपारी 2 वाजता आयोजित केलेली आहे.

तरी सदरील आरक्षण सोडतीस ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार सुराणा यांनी केले आहे. या सोडतीत अनुसूचित जातीसाठी 6 अनुजाती महिला साठी 3,अनुसूचित जमातीसाठी 14,अनु जमाती महिलां साठी 7,नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी 32, ना.मा.प्र महिलां साठी 16,खुल्या प्रवर्गातील सर्वसा धारणसाठी 67 तर सर्वसाधारण महिलांसाठी 34 याप्रमाणे सरपंच आरक्षण काढण्यात येणार आहे.सदर सोडतीकडे संपूर्ण अमळनेर तालुक्यातील 119 गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.




