
अमळनेर:- तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे खुर्द येथे बालिका पंचायतीच्या सदस्यांनी व गावकऱ्यांनी आईच्या नावाने एक झाड उपक्रम राबवत वृक्षारोपण केले.

किशोरवयीन १४ ते १८ वर्षे वयोगटातील बालिकांच्या स्नेही पंचायतच्या सरपंच गायत्री विनोद पाटील यांचे नेतृत्वाखालील उपसरपंच व ११ ग्रा.पं. सदस्यांनी ग्राम पंचायतीचा कारभार चालविला, त्याचे सर्व गावकऱ्यांनी कौतुकाची केले आहे. जि प मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी गटविकास अधिकारी एन आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील किशोरवयीन १५ मुर्तीची निवड करून त्यातून सरपंच व उपसरपंच निवडून दिले असून स्नेही बालिका पंचायतची स्थापना करत त्यामाध्यमातून विविध उपक्रम राबवणे सुरू आहे.

कन्या बँक,वृक्षरोपण,दारू बंदी,शाळेला आरओ, मुलींसाठी पौष्टिक आहाराचे वाटप ग्रामपंचायतच्या माध्यमातून करणे. कुमारवयीन मुलींचे आरोग्याची काळजी करणे साठी विविध आरोग्य सुविधा बाबत चे कॅम्प घेणे,लोकसहभागातून पाणी अडवण्यासाठी प्रयत्न करणे आदी उपक्रम सुरू आहेत.

सरपंच सौ वर्षा युवराज पाटील, कै सुकलाल आनंदा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय भोसले सर स्नेही बालिका पंचायतच्या सरपंच गायत्री विनोद पाटील यांनी हा उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामपंचायत पिंपळे खुर्द प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ वर्षा युवराज पाटील व सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील एक झाड आईच्या नावाने लावत मोठ्या उत्साहाने परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली महिला बचत गटाला यावेळी ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येकी एका गटाला दहा झाडे वाटप करण्यात आली आहेत.




