
अमळनेरातून चोरी झालेल्या कारच्या तपासासाठी गेले होते पथक
अमळनेर-शहरात चोरीस गेलेल्या कारच्या तपासासाठी मध्यप्रदेशात गेलेल्या अमळनेर पोलिसांच्या पथकास बाहेर गावाहून चोरीस गेलेल्या दोन कार हाती लागल्या असून सदर कार ताब्यात घेऊन अमळनेरात आणण्यात आल्या आहेत.
दि.24 मे 2025 रोजी रात्रीच्या सुमारास अमळनेर शहरातील ओमसाई श्रध्दा नगर येथील फिर्यादी नामे प्रविण हरिश्चंद्र ठाकुर यांच्या मालकीची रू. 1,50,000/- रू. कि. ची एक पर्पल पांढ-या रंगाची मारूती सुझुकी कंपनीची डिझायर NEW VDI मॉडेलची चारचाकी गाडी फिर्यादीचे घरासमोरून कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याने अमळनेर पोलीस स्टेशन दाखल करण्यात आला आहे.सदर चोरीस गेलेल्या चारचाकी वाहनाचे तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनिय माहितीच्या आधारावर डीवायएसपी विनायक कोते यांचे सुचनांप्रमाणे वाहनाच्या तपासकामी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मागदर्शनाखाली अमळनेर पोलीस स्टेशन मधील गुन्हे अन्वेषण पथकाचे पो.उप.नि. शरद बागल, पो.उप.नि नामदेव आनंदा बोरकर, पो.शी विनोद किरण संदानशिव, प्रशांत विजय पाटील, निलेश सुभाष मोरे,उज्वलकुमार बुधा म्हस्के व उदय बोरसे यांना 06 जुलै रोजी अशांना मध्य प्रदेशात रवाना केले. त्यानुसार सदर पथकास मध्य प्रदेशातील मंदसोर जिल्हयातील सितामउ तालुक्यातील रावठी गावात सदर गुन्हयातील संशयित इसम नामे राहुल पाटीदार (पुर्ण नाव माहित नाही) याने त्याच्या घराच्या मागील बाजुस असलेल्या गोडाउन मध्ये सदर गुन्हयातील चोरीस गेलेले वाहन लपवुन ठेवले असल्याने सीतामउ पोलीस स्टेशन कडील पोलीस मदत घेवुन नमुद संशयित इसमाच्या घराची व गोडाउनची झडती घेतली असता त्या ठिकाणी इतर ठिकाणावरून चोरी केलेले एक टोयोटा कंपनीची पांढ-या रंगाची फॉरच्युनर वाहन व एक हुंडाई कंपनीची पांढ-या रंगाची क्रेटा कार मिळून आली.सदर चारचाकी वाहने जप्त करून नमुद वाहनांना अमळनेर पोलीस स्टेशन येथे आणले असता त्याच्या तपासात वर नमुद चारचाकी वाहन राणाप्रताप नगर पोलीस स्टेशन, नागपुर (शहर) येथील दाखल गुन्हयातील तसेच जळगाव (तालुका) पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झालेले आहे.




