
अमळनेर – तालुक्यातील अमळगाव येथे श्री गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादाने अमळगाव येथे एक अद्वितीय आध्यात्मिक सोहळा साजरा होणार असून, बुधवार दिनांक १६ जुलै २०२५ रोजी सकाळी ७:३० ते दुपारी ३:३० या वेळेत श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण सौ. विद्याताई पडवळ यांच्या सुस्वर आवाजात होणार आहे.
या भक्तिभावपूर्ण कार्यक्रमात गजानन महाराजांचे दर्शन, प्रवचन, भजन, नामस्मरण व महाप्रसादाचा समावेश असून, संपूर्ण वातावरण भक्तिरसाने न्हाऊन निघणार आहे. सौ. पडवळ यांच्या मुखोद्गत वाचनातून भक्तांना श्री गजानन विजय ग्रंथातील अमोघ वचने ऐकण्याची अत्यंत दुर्मिळ संधी मिळणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन श्री गजानन भक्त परिवार व समस्त ग्रामस्थ मंडळी, अमळगावं यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे ठिकाण लता रमण हॉल, जळोद रोड, अमळगांव ता.अमळनेर येथे आहे. सर्व भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




