
अमळनेर:- राष्ट्र सेवा दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अजित शिंदे यांनी अमळनेर येथील साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाला भेट दिली.
पाहुण्यांचे स्वागत प्रा.अरविंद सराफ, शुभम पवार ,चेतन सोनार,मिलिंद वैद्य व तरुणाई यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रस्तावना गोपाळ नेवे यांनी केले. धुळे येथील राष्ट्रसेवादल सहकारी यांचे स्वागत रोहित पाटील, लोकेश वाणी , शिव निकम हेमंत साळुंखे , नाविण्य पाटील प्रथमेश चौधरी , अभय वाघमोडे विक्रांत शेजवल , तुषार पाटील , आश्विनी वाघमोडे यांनी गुलाब फुल व पर्यावरण संरक्षण संतुलन साठी कापडी पिशवी देऊन केले. अजित शिंदे यांनी आतापर्यंत स्मारकावर झालेले कामकाज समजून घेत एक वडाचे झाड लावले. या वटवृक्ष प्रमाणे आपण तरूणाईला काम करण्यासाठी सावली निर्माण करून देऊ, असे सांगत कार्यक्रमाची सांगता झाली. साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाचे कृतीशील सहकारी , हितचिंतक, पाठीराखे, पालक,
पदाधिकारी विश्वस्त यावेळी उपस्थित होते.




