
अमळनेर तालुक्यात झाले पाच गट,21 जुलै पर्यंत हरकतीची मुदत
अमळनेर-आगामी काळात होणाऱ्या जळगाव जिल्हा परिषदे निवडणूकीसाठी प्रारूप गटरचना काल दिनांक 14 रोजी जाहीर झाली असून अमळनेर तालुक्यात पाच गटांची निर्मिती करण्यात आली आहे.दिनांक 21 जुलै पर्यंत हरकतीसाठी मुदत देण्यात आली आहे.
याआधी 2017 साली झालेल्या निवडणुकीत अमळनेर तालुक्यात पाच पैकी एक गट कमी होऊन चार गट झाले होते.ही मुदत संपल्यावर 2022 साली झालेल्या गट रचनेत पुन्हा पाच गट जाहीर झाले होते मात्र त्यानंतर न्यायालयीन अडचणीमुळे निवडणुका स्थगित झाल्याने जि प वर 3 वर्ष प्रशासक राज होते.आता सुप्रीम कोर्टाने निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर होऊ घातलेल्या निवडणूकीसाठी प्रारूप गट रचना जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली असून यानुसार अमळनेर तालुक्यात पुन्हा पाच गटांची निर्मिती झाली आहे.
असे आहेत पाच गट
अमळनेर तालुक्यात कळमसरे,पातोंडा,दहिवद,मांडळ व जानवे असे पाच गट झाले असून साधारणपणे ऑक्टोबरमध्ये या निवडणूक होण्याचे चिन्ह आहेत. संबंधितांना 21 जुलै पर्यंत अमळनेर तहसीलदार यांच्याकडे गटाबाबत हरकती नोंदविता येणार आहेत.




