
अमळनेर:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट मेरी इंग्लिश मेडीयम हायस्कूल मधील विद्यार्थी अर्जुन ज्ञानेश जोशी अमळनेर तालुक्यातील सर्व उत्तीर्ण व शिष्यवृत्ती धारक, इंग्रजी व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांमध्ये अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांकाने व जळगाव जिल्ह्यात 11व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
शाळेच्या प्राचार्या सिस्टर स्मिता अँथोनी व
शाळेच्या व्यवस्थापिका सिस्टर डिवाइन व सर्व शिक्षकांचे त्याला मार्गदर्शन लाभले. प्रताप महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक डॉ. पी. जे.जोशी व प्राध्यापक डी. एस. लोहार यांचा नातू, आणि उद्योजक ज्ञानेश जोशी व अर्जुन बायोलॉजी क्लासेस च्या संचालिका सौ सोनल जोशी यांचा मुलगा आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.




