
प्रवीण गायकवाड यांना काळे फासणाऱ्यांवर कारवाई करा,तालुका महाविकास आघाडीच्या निवेदन
अमळनेर– तालुका महाविकास आघाडीच्या वतीने प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. तसेच संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.
या निवेदन प्रसंगी महाविकास आघाडीचे नेते व तालुक्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुभाष पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, प्रा. अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डी. एम. पाटील, शहराध्यक्ष प्रशांत निकम, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, ज्येष्ठ नेते धनगर पाटील, संदीप घोरपडे, प्रताप पाटील, श्याम पवार, शरद पाटील, बन्सीलाल भागवत, सुलोचना वाघ, योजना पाटील, प्रा. सुभाष पाटील, शिवसेनेचे चंद्रशेखर भावसार, गोकुळ कोळी, देवेंद्र देशमुख, डॉ. रवींद्र पाटील, ज्येष्ठ नेते मनोहर निकम, भास्कर बोरसे, सिंधू वानखेडे, मनोज पाटील, कैलास पाटील, मनोहर पाटील, योगेश सिसोदे यांच्यासह महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एम. पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन गजेंद्र साळुंखे यांनी मानले.




