
भोजमल पाटील यांना उमेदवारी देण्याची रामेश्वर बु. सरपंच राजेंद्र पाटील यांची मागणी…
अमळनेर:- तालुक्यातील दहीवद -कन्हरे जिल्हा परिषद गटातून माजी पंचायत समिती सदस्य भोजमल मालजी पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी रामेश्वर बु. येथील सरपंच राजेंद्र पाटील यांनी केली आहे.
पंचायत समिती सभापतीसारख्या महत्त्वाच्या पदाचा अनुभव असलेल्या भोजमल पाटील यांचे सामाजिक कार्य सर्वज्ञात असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांची महत्त्वपूर्ण संघटनात्मक पदांवर वेळोवेळी निवड झालेली आहे. यंदा ते जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असून त्यांनी आपला संपर्क कायम ठेवला आहे.
भोजमल पाटील सध्या अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असून बाजार समितीत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. अमळनेर पंचायत समितीचे सभापती असतांना तालुक्यात विकास कामाना प्राधान्य देत लोकाभिमुख कामे त्यांनी केलेली होती. त्यांचा तालुक्यात आणि मतदार संघात मोठा जनसंपर्क आहे .ते नेहमी सर्व सामान्य लोकांच्या सुख दुःखात सामील होत असतात. गटातील प्रत्येक गावात जावून लोकांच्या समस्या जाणून घेवून सोडवण्यासाठी तत्पर असतात गटातूनच त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी अशी मागणी रामेश्वर बु. येथील सरपंच राजेंद्र दिनकर पाटील यांनी केली आहे. सर्वच बाबतीत सक्षम व जनतेच्या संपर्कात असलेला उमेदवार म्हणून माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील हे भोजमल पाटील यावेळी नक्कीच उमेदवारी देतील असेही राजेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.

