
अमळनेर (प्रतिनिधी) अग्निशमनाचे साहित्यांचा वापर करून अमळनेर नगरपरिषद अग्निशमन विभागातील कर्मचारी गणेशोत्सव साजरा करीत आहेत.
गणेशेत्सवाचे आगमन झाले असून शहरात भक्तीमय वातावरण निर्णाण झाले आहे. यात अमळनेर नगरपरिषद अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमनाचे साहित्यांचा वापर करून पर्यावरण पूरक गणपती बनवला. यासाठी मुख्यधिकारी तुषार नेरकर, अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. दिनेश बिऱ्हाडे, फारुक शेख, जफर पठाण, आनंदा झिंबल, सत्यम संदानशिव, मच्छिंद्र चौधरी, भिका संदानशिव, वसीम पठाण, आकाश संदानशिव, बाळकृष्ण जाधव, भिकन पठाण, लखन कंखरे, विकी भोई या कर्मचाऱ्यांनी सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवून आगळावेगळा गणेशोत्सव साजरा केला. या गणेशोत्सवाचे शहरातून कौतुक केले जात आहे.




