
अमळनेर:- तालुक्यातील पिंपळे बु येथील कै.सु.आ.पाटील माध्य. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एच. भोसले यांच्या सेवापूर्तीनिमित्त भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी के पवार सर हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून,ग्राम विकास मंडळ नवलनगरचे प्रशासकीय अधिकारी बी.टी पाटील, भालेराव सर, माजी प्रशासकीय अधिकारी एस एन पाटील, तसेच त्यात त्यांचे बंधू विजय भोसले आणि संपूर्ण परिवार उपस्थित होते.
सुरुवातीला सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. एस एच भोसले यांनी उत्तम प्रशासन, शिस्तप्रिय कारभार, तसेच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व गुणवत्तापूर्ण शिक्षण रुजविण्याचे कार्य केले. त्यांच्या कष्टाळू, दूरदृष्टी असणाऱ्या कार्यपद्धतीमुळे विद्यालयाने अनेक क्षेत्रांत लक्षणीय प्रगती साधली आहे. कार्यक्रमात सरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ग्राम विकास मंडळ नवलनगरचे सर्व मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षक तसेच माजी मुख्याध्यापक ,शिक्षक विद्यार्थी मनोगते व्यक्त करून सरांच्या कार्याचे कौतुक केले.




