
अमळनेर – तालुक्यातील पिंपळे येथे श्री शनेश्वर मित्र मंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, संगीत खुर्ची, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा विकास व्हावा या उद्देशातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत इयत्ता दुसरी ते पाचवी व इ.६ वी ते १० वीच्या दोन गटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गणेशोत्सव निमित्त विद्यार्थ्यांनाही गणेशाची विविध रूपे रांगोळीच्या माध्यमातून मांडायची होती. इयत्ता सहावी ते दहावी चे विद्यार्थ्यांनी पाणी आडवा पाणी जिरवा व पर्यावरण समतोल कसा राग येईल रांगोळीच्या माध्यमातून मांडण्यात आली. एकदम अचूकतेने पर्यावरण समतोल व गणपतीची विविध रूपे रांगोळीच्या साहाय्याने मांडली होती. या कार्यक्रमाचे उदघाटन प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा पाटील, मिराबाई चौधरी, कल्याणी चौधरी, मानसी चौधरी, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, ओम साई क्लासेसचे संचालक ज्ञानेश्वर पाटील यांनी निबंध स्पर्धेला सहकार्य केले व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी त्याचवेळी निकाल घोषित केला. विद्यार्थ्यांना बक्षीस ग्रामस्थ ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी व महिला मंडळींच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.




