
महिलांनाही अश्लील शिवीगाळ व इशारे केल्याने ८ ते ९ जणांवर गुन्हा दाखल
अमळनेर : ईद ए मिलादची मिरवणूक आटोपून गल्लीत महिलांना अश्लील शिवीगाळ व दगड विटांनी मारहाण केल्याची घटना ८ रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास शिवशक्ती चौकात घडली.
८ रोजी सायंकाळी मिरवणूक आटोपून शिवशक्ती चौकाच्या गल्लीतून जात असताना मोहसीन मेहमूद बागवान , शाहरुख बागवान , तन्वीर बशीर खाटीक , रेहान कलीम खाटीक व त्यांच्यासोबत चार पाच जण यांनी गल्लीतील महिलांना अश्लील शिवीगाळ व इशारे करू लागले. तसेच दगडफेक सुरू केली. एका महिलेच्या टाचेला दुखापत झाली. महिलांनी पोलीस स्टेशन गाठून वरील सर्व जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता ७९, २९६ , ११५(२),३५१(२), ३५२, १८९ (२),१९१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.
दरम्यान दगडफेक सुरू होताच नागरिकांची पळापळ सुरू झाली. आणि गावात दंगल झाल्याची अफवा पसरली. नागरिकांत भीती निर्माण झाली. मात्र सुदैवाने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर , डीवायएसपी विनायक कोते , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तला असल्यामुळे तातडीने पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यात एलसीबी पोलीस निरीक्षक जितेंद्र वलटे , पो कॉ हितेश बेहरे याना देखील दगड लागला. आणि एका नागरिकाला दगड लागून तोही जखमी झाल्याचे कळते.
चाळीसगाव डीवायएसपी विजय ठाकुरवाड , चोपडा पोलीस निरीक्षक मधुकर साळवे , भडगाव पोलीस निरीक्षक महेश शर्मा , चाळीसगाव ग्रामीण चे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील , पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार स्थानिक अधिकाऱ्यांसह सतरा अधिकारी १३२ पोलीस कर्मचारी , ९५ होमगार्ड , तीन दंगा काबू पथक , दोन स्ट्रायकिंग फोर्स असा बंदोबस्त तैनात होता. शहरात धार्मिक स्थळावर बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरात तणावपूर्ण शांतता होती.




