
अध्यक्षपदी किशोर बितराई तर कार्याध्यक्षपदी महेंद्र पाटील
अमळनेर-सालाबादप्रमाणे याही वर्षी न्यू प्लॉट परिसर विकास मंचतर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात नवरात्र उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
यासंदर्भात नियोजन करण्यासाठी मंडळाची बैठक दिनांक 9 रोजी ,मंचचे अध्यक्ष चेतन राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.सदर बैठकीत खालीलप्रमाणे कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.
अध्यक्ष- किशोर बितराई,कार्याध्यक्ष -महेंद्र पाटील,उपाध्यक्ष -दिनेश मणियार,सौरभ जैन,रोहन आठवले,सचिव-विशाल खिलोसोया,प्रितराजसिंग बग्गा,खजिनदार-रघुनाथ पाटील,पवन शर्मा,संघटक-प्रणित झाबक,अतुल राजपूत,केयुर ठक्कर,प्रतीक कोराणी,निखिल पवार,प्रतीक शहा,प्रसाद जानवे,सचिन झारे,तन्मय बोरकर
सदर बैठकीत न्यू प्लॉट परिसर विकास मंचचे पदाधिकारी बिपीन पाटील, राजू साळी,महेश राजपूत, स्वर्णदीप राजपूत,निखिल नागदेव,प्रशांत लंगरे, अक्षय जैन,तेजु जामखेडकर यासह असंख्य सदस्य उपस्थित होते.आकर्षक धार्मिक देखावे,विविध स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम व समाजसेवी उपक्रम यावर्षी राबविले जाणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष महेंद्र पाटील यांनी दिली.




