
अमळनेर : खदाणीत पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शिरूड रस्त्यावर खदाणीत ११ रोजी घडली.
जितू रामचंद्र भिल (वय ३५) हा मंगरूळच्या खदाणीत बुडाला असल्याची माहिती लक्ष्मण शंकर पाटील यांनी जितू चा चुलत भाऊ तुळशीराम लक्ष्मण भिल याला सांगितले. त्यांनी मिलिंद पाटील व सुनील आत्मराम भिल यांना सांगून त्याला बाहेर काढले. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चुलत भावाच्या फिर्यादीवरून अमळनेर पोकिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




