
अमळनेर:- शहरातील स्व.श्री .एम .एस . मुंदडा माध्यमिक विद्यालयात १४ सप्टेंबर रोजी असलेल्या हिंदी दिवसा निमित्ताने देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा तसेच सामान्य ज्ञानावर आधारित जनरल चालता बोलता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी १३ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.
यात प्रथम – वर्षा ठाकरे (इयत्ता -१० वी), द्वितीय- वैष्णवी कोळी (इयत्ता १० वी), तृतीय शितल जाधव (इयत्ता १० वी), उत्तेजनार्थ गायत्री कोळी ((इयत्ता ९ वी) यांना बक्षीस वाटप करण्यात आले.
परीक्षक म्हणून उपशिक्षिका नेहा पाटील,किशोर पाटील व राजेंद्र महाजन यांनी कामकाज पाहिले. देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे सुत्रसंचालन इ १० वी चा विद्यार्थी यशवंत कोळी याने केले,विद्यार्थी मनिष सोनवणे याने आभार मानले.
यावेळी सामान्यज्ञाना वर आधारित चालता बोलता कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज वर आधारीत दोन प्रश्न विचारण्यात आले. व दोघे प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलेल्या विद्यार्थ्यास बक्षीस देण्यात आले. विद्यार्थ्यांनी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा खूपच आनंद घेतला.
कार्यक्रमाचे नियोजन हिंदी विषय शिक्षक सुनिल पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक धनराज महाजन,गोपाल पाटील,राहुल भदाणे, शिक्षकेत्तर कर्मचारी धमेंद्र साळुंखे उपस्थित होते.




