
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ग्रामपंचायतीचे माजी लिपिक सुभाष पाटील यांची नुकतीच महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या विभागीय सचिवपदी निवड करण्यात आली.
सुभाष शिवाजी पाटील हे अमळनेर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे सचिव असून त्यांची नुकतीच विभागीय सचिवपदी निवड झाली. राज्य कार्यकारणीच्या हिंगोली येथील बैठकीत युनियनचे राज्य अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू व सरचिटणीस गिरीश दाभाडकर यांनी सदर निवड जाहीर केली. त्याच्या या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, सचिव प्रदीप महाजन, संघटक विश्वास कोळी, अमळनेर तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटील, ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन केले जात आहे.




