
जिल्ह्यातील तीनही मंत्री व लोकप्रतिनिधींची राहणार उपस्थिती
अमळनेर:-खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर या प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा भव्य समारंभ येत्या शनिवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमात शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाच्या प्रगतीस हातभार लावणारी अनेक नवी उपक्रमशील प्रकल्पांची उद्घाटने होणार असून, त्यामध्ये श्री. र. का. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसीच्या विस्तारीत इमारत, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी नूतन अत्याधुनिक संगणक लॅबचे, प्रताप महाविद्यालयातील नवीन सुसज्ज सेमिनार हॉल, तसेच पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या संगणक लॅबचे व्हर्च्युअल स्वरूपात उद्घाटन होणार आहे.
या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष ना. गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा मंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री जळगाव जिल्हा), तसेच विविध विकास कामांचे उद्घाटक म्हणून ना. गिरीश महाजन (जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य), ना. संजयजी सावकारे (वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य), खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार अनिल पाटील (माजी मदत व पुनर्वसन मंत्री) तसेच प्रमुख अतिथी म्हणून धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल,पारोळ्याचेआमदार अमोल पाटील ,आमदार सत्यजीत तांबे,माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील,कृषिभूषण साहेबराव पाटील, शिरीष चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक मान्यवर अतिथींची उपस्थिती लाभणार आहे.
खानदेश शिक्षण मंडळाच्या सर्व संस्थांचा शैक्षणिक विकास आणि आधुनिकतेकडे वाटचाल या कार्यक्रमातून दृढ होणार आहे.सदर कार्यक्रमास खा. शि. मंडळाचे सर्व सभासद, शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थी, पालकवर्ग व नागरिकांनी उपस्थित राहून या शुभ कार्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन खान्देश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.




