
वारंवार चोऱ्यांमुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण
अमळनेर:- येथील भागवत रोड वरील अजय ट्रॅव्हल्स समोर न्यू.संगम मोबाईल, न्यू. खुशबू मोबाईल व सुबक जनरल स्टोअर येथे सकाळी दुकान उघडायला व्यापारी गेले असता दुकानाच्या वरील बाजूस पत्रा व सन्मायका कापून चोरी झाल्याचे आढळले आहे.
या चोरी मध्ये ग्राहकांचे रिपेरिंगला आलेले मोबाईल, इतर किरकोळ वस्तू चोरी झाली असल्याचे दुकानदारांनी सांगितले. तसेच वरील पत्रा कापल्याने फर्निचरचे नुकसान झाले आहे.तसेच दोन दिवसापूर्वीही किर्ती मोबाईल येथे चोरी झाली होती. या आधीही या परिसरात अनेकदा दुकाने फोडून चोऱ्या झाल्या आहेत.आतापर्यंत सर्व चोरीची पद्धत सारखीच असून यामुळे परिसरातील लहान व्यापारी भयभीत झाले आहेत. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून नेहमीच होणाऱ्या चोऱ्यांमुळे व्यापारी वर्ग चिंतेत व भयभीत आहे.यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची गरज आहे.यावर उपाय करण्यासाठी दुकानदारांनी मोबाईल व्यापारी असोसिएशन तसेच अमळनेर व्यापारी असोसिएशन आणि शिवसेना पदाधिकारी यांचेकडे आपली कैफियत मांडली आहे.




