
अमळनेर :- वंदे मातरम गीतास 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्षे पूर्ण होत असल्याने वर्धापन दिन साजरा करण्यासंदर्भ अमळनेर येथील तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली.
यावेळी राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये वंदे मातरम गीत गायन देशभक्तीपर भाषणे, वकृत्व स्पर्धा, निबंध लेखन यासारखे विविध कार्यक्रम राबवीण्यात येणार आहेत.याप्रसंगी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून अमळनेर तालुक्यात पुढील कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली ता. 4 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.यात ता. 7 नोव्हेंबर रोजी अमळनेर येथील साने गुरुजी शाळेत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पाच हजार विद्यार्थी -विद्यार्थीनी यांच्या समूहात वंदे मातरम गीत गायन सकाळी साडे दहा वाजता सादर करण्यात येईल.
या बैठकीस गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, संदीप घोरपडे, मेघराज महाजन, अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, पत्रकार बाबुलाल पाटील, आशिष चौधरी, दत्तात्रय सोनवणे, पंकज भावसार, चंद्रकांत मुसळे, बापू संदानशिव, दिलीप भावसार, विलास बोरसे, प्रभारी प्राचार्य विजय वाणी, अनिल दुसाने, डी. एस. पाटील यांची उपस्थिती होती.
ता. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता तालुक्यातील नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी केले आहेत.




