
जागा आणि उमेदवारांचा पेच कायम, खलबते सुरू…
अमळनेर:- शहरातील नगरपरिषद निवडणुकीच्या अर्ज मानांकन भरण्याच्या पहिल्या दिवशी नगरसेवक पदासाठी एकच अर्ज दाखल झाला आहे.
प्रभाग क्रमांक सहा मधून काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक मनोज भाऊराव पाटील यांचा एकमेव अर्ज काल दाखल झाला आहे.
उमेदवारी आणि जागांवरून पेच सुरूच…
अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस उगवला तरी कोणत्याही आघाडीचे अधिकृत उमेदवार निश्चित झाले नसून विरोधी गटाकडून उमेदवार घोषित झाल्याशिवाय आपले अधिकृत उमेदवार जाहीर करायचे नाहीत असा मनसुबा नेत्यांमध्ये दिसून येत आहे. अनेक ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीचे मातब्बर उमेदवार समोरासमोर येण्याची शक्यता असून शहर विकास आघाडीकडून कोणाची लॉटरी लागते आणि त्यावेळी इतर उमेदवार कोणती भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दोन नंबरचा पैसा जनतेसाठी खर्च होणार…
वाळू, आकडा, सट्टा, दारू, रेशन यातून बक्कळ पैसा कमाई करणारे व अवैध धंद्यातून मोठी गंगाजळी कमावलेले अनेक जण जनतेची सेवा करण्यासाठी सज्ज झाले असून मतदार राजा ही त्यांची उत्सुकतेने वाट पाहत आहे.




