
अमळनेर:- तालुक्यातील अमळगाव येथील ५० वर्षीय इसमाने झाडाला गळफास लावून घेत जीवनयात्रा संपल्याची घटना २८ रोजी घडली आहे.
अमळगाव येथील दिलीप अभिमान भील (वय ५०) यांनी पिंपळी रस्त्यालगत बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास लावून घेतल्याची माहिती २८ रोजी सकाळी ७ वाजता मिळाल्याने त्याचे नातेवाईक व ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. त्याचा मृत्यू झाल्याचे समजल्याने त्यास खाली उतरवून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरद भील याने दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय श्रावण पाटील हे करीत आहेत.




