
अमळनेर:- तालुक्यातील पिंपळी येथे सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवानिमित्त महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळी तर्फे भव्य रॅली तसेच विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संपूर्ण गावातून भव्य अभिवादन रॅलीत इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला.
रॅलीतील अखंड विज्ञान ज्योत सावित्रीबाईंच्या वेषात असलेली कुमारी मानसी नरेंद्र महाजन तसेच इयत्ता दहावी वर्गातील विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, कोळीनृत्य, भारतीय वेशभूषा, आदिवासी वेशभूषा, शेतकरी वेशातील बालिका, अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित देखावे, तसेच बालिकांचे मैदानी खेळ (काठी फिरवणे) चे विविध आकर्षने रॅलीत पाहावयास मिळाले. सदर अभिवादन रॅली त सर्व ग्रामस्थांनी तसेच महिला भगिनींना ,माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला..
अभिवादन रॅलीचा समारोप श्रीराम मंदिर चौक या ठिकाणी विविध नृत्य अविष्काराने करण्यात आला. या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच प्रेमराज वामनराव चव्हाण हे होते , विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन. डॉ. जीवनलाल भीवसन जाधव यांच्या हस्ते वैज्ञानिक प्रयोगाने करण्यात आले.
सामान्य ज्ञान हस्तलिखिताचे प्रकाशन या ठिकाणी पालकांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी चेअरमन जनार्दन मांगो शेलकर, सचिव हिम्मत श्रावण चव्हाण, उपाध्यक्ष संतोष गजमल महाजन, संचालक दिपचंद भिला पाटील, शिवराम शामराव महाजन, सोमा भिका पाटील, प्रदीप पांडुरंग चव्हाण, विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास शेलकर , सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद ,तसेच गावातील ज्येष्ठ मंडळींमधील क्षत्रिय काच माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नाटू चव्हाण, मधुकर रघुनाथ महाजन, बाळकृष्ण लोटू महाजन, रवींद्र दोधू महाजन,विजय शिवराम महाजन, प्रकाश गोबा पाटील, प्रकाश आत्माराम शेलकर , नितीन रमेश शेलकर व गावाच्या पोलीस पाटील सौ मीना निलेश महाजन.. तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला ,बालके, अबाल वृद्ध उपस्थित होते..
गावातील मंगल कार्यालयात डॉ, अब्दुल कलाम कक्ष स्थापन करून. “विज्ञान अविष्कार 2026″या नावाने योजनाबद्ध सुंदर मांडणी करत भारतातील सुप्रसिद्ध वैज्ञानिकांची माहिती, वैज्ञानिक शोध आणि शोधाचे जनक यांची माहिती तसेच विद्यार्थ्यांचे एकूण 65 विविध विषयांवरील उपकरणे या ठिकाणी मांडण्यात आली होते सर्व बाल वैज्ञानिकांचे ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश सावळे सर यांनी केले सूत्रसंचालन कुमारी प्रियल किशोर शेलकर हिने केले.
आभार संदीप सोमा पाटील सर यांनी मानले .




