
आज प्रताप महाविद्यालयात होणार अधिकृत निवड
अमळनेर:-येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षपदी नीरज दिपचंद अग्रवाल व तर कार्योपाध्यक्षपदी जितेंद्र मोहनलाल जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून
आज दिनांक 16 रोजी प्रताप महाविद्यालयातील संस्थेच्या कार्यालयात सकाळी 9.30 वाजता होणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या सभेत अधिकृत निवड होणार आहे.
त्यानंतर महाविद्यालयातच सत्कार समारंभ पार पडणार आहे.खा.शि.मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडुन यात सत्ताधारी संचालकांच्या आशीर्वाद पॅनलचे आठ पैकी सहा उमेदवार विजयी झाल्याने या पॅनलला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे.निवडणूक पार पडल्यानंतर प्रथम चेअरमन व व्हा चेअरमन पदाची संधी कुणाला मिळणार याबाबत उत्सुकता होती. यासंदर्भात दिनांक 15 रोजी झालेल्या पार्टी मिटिंग मध्ये नीरज अग्रवाल व जितेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून अधिकृत निवड आजच्या सभेत होणार आहे.तरी सदर निवडीनंतर आयोजित सत्कार सोहळ्यात सर्व सभासद,हितचिंतक आणि शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन आशीर्वाद पॅनलतर्फे करण्यात आले आहे.




