
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथे दिव्यांग बांधवांनी एकत्रित येऊन दिव्यांगांना ग्रामपंचायतीकडून त्यांच्या स्व उत्पन्नातील पाच टक्के निधी दिव्यांगांना देणे बंधनकारक असल्याबाबत निवेदन देत अन्न त्याग आंदोलनाचा इशारा दिला.
हा निधी ग्रामपंचायत स्वतःच्या महसुलातून (जसे कर, शुल्क इ.) गोळा केलेला असतो आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार (महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, नियम ३७) दिव्यांग कल्याण साठी राखीव ठेवला जातो. त्यासाठी मांडळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिव्यांग सेल जिल्हा अध्यक्ष शांताराम सखाराम कोळी यांनी ग्रामसेवक प्रांजल वाघ, सरपंच कविता दीपक बडगुजर यांना गावातील सर्व दिव्यांग बांधव एकत्रित येऊन निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष शांताराम कोळी बोलतांना म्हणाले की जर आमच्या निवेदनाचे दुर्लक्ष केले तर आम्ही ग्रामपंचायत जवळ अन्न त्याग उपोषण करू असे सांगितले आहे. त्याप्रसंगी गावातील कोळी समाज जिल्हाध्यक्ष रावसाहेब कोळी, समाजसेवक संदीप सर, राष्ट्रवादी पक्षाचे तालुका उपाध्यक्ष वासुदेव पवार, दीपक बडगुजर, जितेंद्र कोळी, अमृत कोळी, नागो महाजन, हिरामण मराठे, ईश्वर कोळी, शांताराम पारधी, मांगुलाल भोई, संजय पाटील, रमेश वाकडे, दिनेश भिल, कैलास धनगर, जफर शेख ,दानिश बेग, रेखाबाई पारधी, मोनीबाई कोळी, जयश्री कोळी, सुनंदाबाई कोळी, चंदनबाई महाजन, असे विविध जाती धर्माचे दिव्यांग बांधव आणि माता भगिनी उपस्थित होते.




