
अमळनेर:-जळगाव तालुक्यातील बोरनार येथील एकावर कोयत्याने वार करून दुखापत केल्याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात वॉन्टेड असलेला अमळनेरचा एमपीडीए मधील आरोपी सतू उर्फ चेतन किरण धोबी यास अमळनेर पोलिसांनी अटक करून जळगाव एमआयडीसी पोलिसात रवाना केले आहे.
या गुन्ह्यातील घटनेची हकीकत अशी की राकेश जगन्नाथ पाटील वय-38 वर्ष, व्यवसाय रा. बोरनार ता. जि. जळगांव याचे त्याच्याच गावात राहणारा प्रेम गोपाल धनगर याचेशी किरकोळ वाद-विवाद झाल्याने त्याचे विरुध्द MIDC पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती, तेव्हापासुन प्रेम धनगर याचे मनात राकेश विषयी विषयी राग होता. दिनाक 28 डिसेंबर 2025 रोजी रात्री 09.30 वा. राकेश त्याच्या मित्रांसह जेवण झाल्यावर घराबाहेर फिरत असतांना प्रेम धनगर हा त्याचे तीन मित्रासोबत मोटारसायकलवर आला आणि याला संपवा” असे म्हणुन त्याचे मोटर सायकलला खोसलेला कोयता हातात घेवुन राकेशच्या डाव्या पायाच्या शिटवर (कमरेखाली) वार करुन जखमी केले.त्यानंतर आरोपी मोटरसायकलने पसार झाले होते,सदर प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद होऊन पोलीस आरोपींचा शोध घेत होते.अखेर या गुन्ह्यात राकेश सोबत अमळनेर येथील एमपीडीएचा आरोपी चेतन धोबी सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी सत्तू ऊर्फ चेतन किरण धोबी यास पोहवा विनोद सोनवणे, सुनील तेली, अमोल करडईकर यांनी पोलीस निरीक्षक श्री निकम व तसेच डीवायएसपी श्री कोते यांचे मार्गदर्शनाने काल रात्री अटक करून अमळनेर येथे गुन्हा दाखल केल्यानंतर एमआयडीसी पोस्टे जळगाव येथे रवाना केले आहे.




