
शासकीय व नीमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेचा निर्णय…
अमळनेर:-वेतनातील तफावत दुर करण्याच्या मागणीसाठी जय महाराष्ट्र शासकीय व नीमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेने असहकार / कामबंद आंदोलन काल दिनांक 24 पासून सुरू केले आहे.
यासंदर्भात संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की संघटनेने शासनास दिलेले लिपीक संवर्गातील वेतनत्रुटी संदर्भातील प्रकरण दिर्घ काळापासुन प्रलंबित आहे. संघटनेने यापुर्वी संबंधित मागण्यांबाबत वारंवार शासनास निवेदने दिलेले असुन मुंबई व नागपुर येथे आंदोलन केलेले आहेत परंतु वेतनत्रुटी बाबत अद्यापही शासनाने समाधानकारक निर्णय घेतलेला नाही.
लिपीक वर्गीय कर्मचा-यांच्या वेतन निर्धारणातील गंभीर त्रुटींबाबत प्रशासनास वांरवार निवदेन देवुनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्मचा-यांचे अर्थिक नुकसान होत आहे.त्यामुळे राज्य संघटनेच्या निर्देशानुसार दि. 24 फेब्रुवारी पासुन बेमुदत काम बंद आंदोनल करण्यात येत आहे.
प्रमुख मागण्या खालील प्रमाणे…
चौथ्या वेतन आयोगापासुन लिपीग वर्गीय संवर्गातील कर्मचारी यांची वेतनत्रुटी दुर करणे., लिपिक वर्गीय संवर्गाचे पदांची संख्या कमी न करता पदोन्नतीचे स्तर कमी करणे,लिपिक वर्गीय संवर्गाचे पदांचे नामकरण विकास अधिकारी व प्रशासन अधिकारी याप्रमाणे करणे,1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागु करणे.,अनु. जाती, जमाती, इमाव, व्हीजेएनटी, एनटी, यांचे पदोन्नतीमधील आरक्षण पुर्वीप्रमाणे लागु करणे.,सरळसेवेमधील मागासवर्गीय आरक्षण पदे भरणे.आदी मागण्यांचा यात समावेश असल्याचे अध्यक्ष मानव पाटील,सचिव दिपक पाटील व उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी म्हटले आहे.




