
अमळनेर – तालुक्यातील जैतपीर येथील सुपुत्री डॉ. योगिता अशोक शिंदे यांची एम.एस. (Ophthalmology – नेत्ररोग) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय, धुळे येथे निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून हा गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
कै.अशोक अजबसिंग शिंदे (माजी बुकिंग क्लार्क, रेल्वे, अमळनेर) यांची त्या कन्या तसेच श्री. किरण अशोक शिंदे (वरिष्ठ फार्मासिस्ट, रेल्वे हॉस्पिटल, अमळनेर) यांची त्या भगिनी असून डॉ. योगिता शिंदे या आधी जिल्हा रुग्णालय, धुळे येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
दिल्ली येथील NEET-PG काऊन्सेलिंग प्रक्रियेद्वारे त्यांनी ही उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी संपादन केली असून हे यश त्यांच्या अथक परिश्रम, संयम आणि दृढ इच्छाशक्तीचे फलित आहे. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी वडिलांचे स्वप्न साकार करत आई-वडील, भाऊ, वहिनी, कुटुंब, गाव व समाजाचे मस्तक अभिमानाने उंचावले आहे. या सुवर्ण यशाबद्दल समस्त राजपूत समाजातर्फे त्यांचे मनःपूर्वक कौतुक करत अभिनंदन करण्यात आले.




