
अमळनेर : दुकानाच्या मालकीवरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना ११ रोजी रात्री तालुक्यातील पिळोदा येथे ग्रामपंचायतीच्या चौकात घडली.

लतीफ इमाम खाटीक याने फिर्याद दिली की ११ रोजी रात्री साडे नऊ वाजता तो त्याचे खाटीक चे दुकान बंद करत असताना समदशहा दगाशहा फकीर हा दुकानजवळ आला आणि माझे दुकान आहे म्हणत दुकानाचे साहित्य अस्ताव्यस्त फेकू लागला. त्याला मनाई केली असता रजाकशहा दगाशाह फकीर , जाकीर दगाशहा फकीर , दगाशहा कदिरशहा फकीर ,सलीम फकीर यांनी लथाबुक्क्यांनी मारहाण केळीव मुलगा नवाज लतीफ खाटीक भांडण आवरायला आला असता त्यालाही लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्यायासंहिता कलम ११५(२), १८९(२), ३२४(२),३५२,३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.
तर दुसऱ्या गटातर्फे शाहरुख समदशहा फकीर याने फिर्याद दिली की११ रोजी रात्री आजोबा दगुशहा कादर्शहा फकीर याना लतीफ इमाम खाटीक मारहाण करत होता तेव्हा मी मोबाईल मध्ये फोटो काढत होता. त्याचे शहानवाज उर्फ गुड्डू लतीफ खाटीक याला वाईट वाटले त्याने सांगितले की तुझ्या वडिलांनी माहितीचा अधिकार टाकला आहे. तुम्हाला मारून टाकू म्हणत लोखंडी रॉड ने हाताच्या डाव्या कामेवर मारले मी खाली पडलो तेव्हा लतीफ खाटीक पण लाथाबुक्क्यांनी मारत होते. नन्तर काका अरमानशहा दगुशहा फकीर आवरायला आले तर त्यांच्याही कपाळावर लोखंडी रॉड ने मारले. अमळनेर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध ११८(१) ,११५(२) , ३५२,३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला अझुं तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.




