
अमळनेर : तालुक्यातील वावडे येथील २७ वर्षीय शेतमजुराने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १९ रोजी दुपारी घडली.

नितीन युवराज भिल (वय २७ रा वावडे) हा प्रवीण आत्माराम पाटील यांच्या शेतात कामाला गेला असताना दुपारी त्याने दादा पिरन भिल या मित्राला फोन करून सांगितले की त्याने विष प्राशन केल्याने त्याला त्रास होत आहे म्हणून युवराज भिल ,त्याचा भाऊ हे शेतात गेले व त्यांनी नितीनला तातडीने धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारसाठी दाखल केले असता डॉ हर्षदा बागुल ,डॉ वसावे यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. काकांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.




