
अमळनेर : तालुक्यातील मारवड येथील रहिवासी व सध्या जळगाव येथे स्थायिक असलेल्या वैष्णवी रवींद्र पाटील हिने एमबीबीएस परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे.

तिने चिपळूण येथील वालावलकर मेडिकल कॉलेजमधून आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असून दिनांक २४ मार्च रोजी आयोजित समारंभात तिला एमबीबीएस पदवी प्रदान करण्यात आली. कु. वैष्णवी पाटील या मारवड येथील रमेश मोतीराम पाटील यांच्या नात आहेत. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.




