
शिंगाणे भावंडांनी समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत ठेवला अनोखा आदर्श…
अमळनेर : अमलेश्वर नगर भागातील रहिवासी तथा सेवा निवृत्त शिक्षक कै. पंडित बाबुलाल भोई (शिंगाणे) यांचे गंभीर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून हसतमुख, प्रेमळ आणि माणुसकी जपणारा माणूस हरपल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
साधी राहणी, प्रेमळ स्वभाव, प्रत्येकावर निरपेक्ष प्रेम आणि समाजाशी घट्ट नाळ जोडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पंडित भोई यांची ओळख होती. त्यांच्या अचानक जाण्याने शिंगाणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, वडिलांचे संस्कार आणि समाजसेवेची परंपरा जिवंत ठेवत त्यांच्या तिन्ही मुलांनी समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनोखा उपक्रम राबवला.

गंधमुक्ती व उत्तरकार्याच्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे, नितीन शिंगाणे आणि डॉ. सुनील शिंगाणे यांनी भोई समाज बांधवांच्या सेवेसाठी शवपेटी भेट देत वडिलांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.
मनोज शिंगाणे यांनी रक्तदानाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना मदतीचा हात दिला आहे, तर डॉ. सुनील शिंगाणे यांनी कोरोना काळात रुग्णसेवेत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. भविष्यातही शक्य तेवढी आरोग्य सेवा व समाजसेवा सुरू ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पांडुरंग शिंगाणे (मेंबर), भागवत महाजन (उपकार्यकारी अभियंता), रणजित शिंदे, सुभाष लंबोळे, नितू भोई, प्रवीण पाटील, नारायण भोई, सामाजिक कार्यकर्ते सुनील भोई, महावीर पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संजय भोई, सामाजिक कार्यकर्ते बापू भोई, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय भोई, संजय साटोटे सर, भाऊसाहेब शिंगाणे, रमेश भोई, पांडुरंग महाजन, कुणाल शिंगाणे, पंकज भोई, दिपक शिंगाणे, सुनील भोई, मोहन भोई, कैलास बेंद्रे, भूषण सुतार, प्रवीण भोई, हिरालाल शिवदे व हिरालाल शिंगाणे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




