अमळनेर:- तालुक्यात काल १५ कोरोना बाधीत आढळले असून सर्व रुग्ण हे शहरात आढळून आले आहेत.
तालुक्यात काल १५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून सर्व शहरी भागात आढळून आले आहेत. त्यामुळे एकंदरीतच शहरात संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत असून एकूणच रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क व सामाजिक अंतर राखणे या उपाययोजनांचा परत विसर पडल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी दिसून येत आहे. बाजारपेठेत, दुकानात तसेच अनेक शासकीय व खाजगी कार्यालयात कार्यालयात विनामास्क येणाऱ्याची संख्या लक्षणीय असून नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने कोणाच्या व्यवसायावर गदा न आणता कार्यवाही सुरू करावी अशी मागणी सुजाण नागरिकांनी केली आहे.