
पिंपळे बु. माध्य विद्यालयातील मुख्याध्यापक ए.ए देसले सन्मानित…
अमळनेर:- तालुक्यातील पिंपळे बु. माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक ए.ए देसले यांना निसर्ग मित्र समितीतर्फे आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ग्रामविकास मंडळ नवलनगर संचलित कै. सु आ पाटील माध्य. विद्यालय, पिंपळे बु. येथील मुख्याध्यापक ए.ए देसले यांना निसर्ग मित्र समितीतर्फे आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी हा पुरस्कार नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे, गोविंद साहेब (नाशिक),समितीचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदुवाल, संतोष आबा पाटील, जिल्हा अध्यक्ष डी.बी.(बापू)पाटील, संस्थापक प्रेमकुमार अहिरे, एस.एम. पाटील, जे.एम. सोनवणे, एन.एस. भामरे, आर.टी.अहिरे, एस.आर. अहिरे, जी.जे. पाटील व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.





