
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय येथे मराठी विभाग व वि. वि. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करणे संयुक्तिक आहे !” या विषयावर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत महाविद्यालयातील नऊ स्पर्धक सहभागी झालेले होते. त्यात द्वितीय वर्ष कला वर्गातील कु. नाजमिन पठाण प्रथम क्रमांक, कु. कोमल पाटील द्वितीय क्रमांक तर कु. पुनम भिल हिने तृतीय क्रमांक पटकावला. प्रस्तुत कार्यक्रमास परीक्षक म्हणून महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ दिलिप कदम व संरक्षण शास्त्र विभाग प्रमुख डॉ जितेंद्र माळी हे लाभले होते. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राचार्य, सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रस्तुत कार्यक्रमाचे आयोजक महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ संजय पाटील यांनी स्पर्धा संपल्यानंतर सदर हॉलमध्येच स्पर्धेच्या निकालाची उद्घोषणा केली. महाविद्यालयातील प्राचार्यांनी अध्यक्षीय मनोगताद्वारे स्पर्धक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले. तद्नंतर उपस्थित मान्यवरांचे तृतीय वर्ष कला वर्गातील विद्यार्थी प्रताप भिल याने आभार मानले. सदर स्पर्धात्मक कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.




