
अमळनेर:- रोटरी क्लब अमळनेर व आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलां- मुलींना सकस आहार वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी प्रोत्साहन निधी देणारे दाता रोहन साळुंखे यांनी किराणा कीट दिले व विनोद अग्रवाल व परीवार यांनी मुला मुलींसाठी ३० प्रोटीन किट उपलब्ध करून दिले. हे किट या गरजू मुलांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आधार संस्थेचे अध्यक्षा डॉ भारती पाटील, रोटरी क्लबचे प्रेसिडेंट प्रतीक जैन, व सेक्रेटरी देवेंद्र कोठारी रोटरी, क्लब सदस्य चेलाराम सैनानी, राजेश जैन, रोहित सिंघवी, ईश्वर सैनानी , चेलाराम सैनानी,महेश पाटील व आधार संस्थेतील कर्मचारी तौसिफ शेख, पुनम पाटील, नंदनी मैराळे, मोहिनी पाटील, ज्ञानेश्वरी पाटील या लोकांनी कार्यक्रम घडवण्यासाठी परिश्रम घेतले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कापडे यांनी केले.




