
खान्देश शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांचा सत्कार…
अमळनेर:- एरंडोल नगर परिषदेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रताप महाविद्यालयातील इ.११ वी सायन्सचा विद्यार्थी सुमित राजेंद्र महाजन याने द्वितीय क्रमांक मिळवून यश मिळवले.

प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्या हस्ते त्याला ३,३३३ रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याबाबत खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिदे, कार्योपाध्यक्ष प्रदिप अग्रवाल, संचालक योगेश मुंदडे, निरज अग्रवाल, हरि भिका वाणी, संदेश गुजराथी, विनोद पाटील, कल्याण पाटील, संस्थेचे चिटणीस व प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एम. जैन, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. उल्हास जी. मोरे, प्राध्यापक प्रतिनिधी प्रा.आर.एम. पारधी , प्रा.मंदाकिनी भामरे, प्रा.जी.एल. धनगर,प्रा.देवेंद्र वानखेडे, प्रा. डी.के. तायडे प्रा.आर.एस. महाजन यांनी सत्कार केला.




