
एकजण गंभीर जखमी, शिरूड नाका भागातील घटना…
अमळनेर:- घराच्या ओट्यावर का उभा राहिला व त्या वादातून एकाने दुसऱ्याच्या गळ्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना २६ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली.

शिरूड नाका शिवाजीनगर भागातील सचिन सुधाकर वराडे (वय ३७) हा रेशन दुकानाशेजारील घराच्या ओट्यावर उभा असताना राजेंद्र उर्फ बापू प्रताप महाजन हा सचिनला तू माझ्या ओट्यावर का उभा आहे ? असे विचारले. त्यावर सचिनने हे आमचे पण घर आहे असे सांगितल्यावर राग आल्याने राजेंद्रने त्याला शिवीगाळ व मारहाण करू लागला. सचिन तेथून निघाल्यावर काही वेळात राजेंद्रने मागाहून जावून सचिनच्या गळ्यावर चाकूने वार केला. गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक विजय पाटील व हेडकॉन्स्टेबल संजय पाटील यांनी भेट दिली. जखमींच्या जबाबावरून आरोपीविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




