अमळनेर:- तालुक्यातील गलवाडे येथे गावठी दारू विक्री करणाऱ्या महिलेला मारवड पोलिसांनी रंगेहाथ पकडत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
मारवड पोलिस ठाण्याचे सपोनि शितलकुमार नाईक यांना मिळालेल्या माहितीनुसार गलवाडे येथे गावठी दारूची विक्री सुरू असल्याने मारवड पोलिसांच्या पथकाने गलवाडे येथे भेट दिली असता भिल्ल वस्तीत महिला गावठी दारू विक्री करत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले. सायत्राबाई भील (वय ५५) असे या महिलेचे नाव असून तिच्याकडून ३० लिटर गावठी दारू मिळून आली. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा नाश करण्यात आला. पोना सुनील तेली यांच्या फिर्यादीवरून महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे कॉ सचिन निकम करीत आहेत.