
लोकेश दीपक पाटील याने जीवघेण्या आजाराशी लढा देत मिळवले यश…
अमळनेर:- जिद्द आणि चिकाटी असल्यास कोणतेही यश निश्चित मिळवता येते हे लोंढवे येथील आबासो एस. एस. पाटील विद्यालयातील लोकेश दिपक पाटील या विद्यार्थ्याने दाखवून दिले. थँलेसेमिया आजारावर मात करून त्याची भुसावळ येथील नवोदय विद्यालयात इ. सहावी पासून पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे.

थँलेसेमिया म्हणजे अतिशय जीवघेणा आजार. ज्या मानसिकतेतून दीपक रघुनाथ पाटील आणि त्यांचे कुटूंबीय सध्या जात आहेत. ते जीवन म्हणजे जिवंतपणी दररोज मरण अनुभवणे होय. लोकेशला दर 21 दिवसांनी जळगांवला जाऊन रक्त घ्यावे लागते. असे जरी असले तरी आज त्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर इयत्ता पाचवीची नवोदयची परीक्षा उत्तीर्ण केली. ही अतिशय विशेष बाब आहे.त्याच्या या कामगिरीमुळे त्याचे आईवडील बहीण हर्षा व लहान भाऊ ललित यांच्या जीवनात एक नवीन आनंद निर्माण झाला आहे. या आनंदाची पालवी निर्माण करण्यात शाळेचे योगदान मोठे आहे. मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, शिक्षक आर. पी.पाटील, महेश पाटील, भारती बहिरम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. कोणत्याही समाज, शैक्षणिक कार्यात आपल्या शाळेचा खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा असायला हवा आणि तो राहतो ,अभिमान वाटतो आपल्या शाळेचा लोकेशने यातून एक प्रकारे एक संदेशच दिला आहे, अशी प्रतिक्रीया मुख्याध्यापक बाळासाहेब यांनी व्यक्त केली.
थॅलेसीमिया हा एक असा आजार आहे जो मुलांमध्ये जन्मापासूनच असतं. आणि जन्मल्याच्या 3 महिन्यानंतर त्याचे लक्षण दिसून येतात. तज्ज्ञ सांगतात की या आजारामध्ये बाळाच्या अंगात रक्ताची कमी होऊ लागते.जेणे करून त्याला बाहेरून रक्त पुरवठा करावा लागतो. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता येते.




