
मविआ व विविध संघटनांनी मौन आंदोलन करत व्यक्त केला निषेध…
अमळनेर:- शहरात अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मिरवणुकीत नथुराम गोडसे, संभाजी भिडे यांच्या प्रतिमा मिरवल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आम आदमी पार्टी, आरएसएस व सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसील कचेरीबाहेर मौन आंदोलन करीत निषेध नोंदवला. खरा तो एकचि धर्म या गीताने आंदोलनाची सांगता करण्यात आली.

जगाला प्रेमाचा संदेश देणाऱ्या सानेगुरुजींच्या कर्मभूमीत महात्मा फुलेंबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे, महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्या प्रतिमा मिरवल्या जातात. सर्वोच्च न्यायालयाची बंदी असतानाही डीजे वाजवले जातात तरी पोलिसात गुन्हे दाखल होत नाहीत याबद्दल नाराजी व्यक्त करत माजी आमदार डॉ बी एस पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, श्याम पाटील, अनंत निकम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, प्रा सुभाष पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डी डी पाटील, प्रा नयना पाटील, जयवंतराव पाटील, महिला जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षा सुलोचना वाघ, प्रा भाग्यश्री वानखेडे, मनोज पाटील, प्रवीण जैन,बी के सूर्यवंशी, फिरोज शेख, राजू शेख, दर्शना पवार,चेतन सोनार, तौसिफ तेली, प्रा गणेश पवार, सनी गायकवाड, नरेंद्र पाटील, के डी पाटील, डॉ चंद्रकांत पाटील,विजय पाटील, राकेश शर्मा, मयूर पाटील, प्रवीण पाटील, नावेद शेख, दबीर पठाण, किशोर महाजन, प्रकाश ताडे, तुषार संदानशीव, कुंदन निकम, प्रवीण पाटील, योगेश शिसोदे, प्रभाकर पाटील यांच्यासह अनेक जण या आंदोलनात सहभागी झाले होते.




