
ग्रामस्थांच्या सोयीसाठी मारवड ग्रामपंचायतीकडून सुविधा उपलब्ध…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड ग्रामपंचायतीने डिजिटल युगात नवीन पद्धतींचा अवलंब करत क्यूआर कोड द्वारे करभरणा करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

मारवड येथील ग्रामपंचायतीने नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांचा भरणा करण्यासाठी युपीआय व क्युआर कोडच्या माध्यमातुन डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून काल दिनांक २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. पाणीपट्टी, घरपट्टी आणि ग्रामनिधीसाठी वेगवेगळ्या क्यू आर कोडची सोय करून देण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. गावाचे ग्रामस्थ व सध्या मुंबईत एलआयसी मध्ये मुख्य विमा सल्लागार मनोहर साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच आशाबाई भील, उपसरपंच भिकनराव पाटील, सदस्य सचिन पाटील, अनिल पाटील, रजनी गुरव, सीमा पाटील, शीतल पाटील, ग्रामसेवक नितीन पाटील, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंखे, लिपिक सुभाष पाटील, मोतीलाल कुंभार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.




