
नगरपरिषदेकडून दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर सुरू…
अमळनेर:- जळोद पंपगृहाच्या ठिकाणी चेकर प्लेट बदलविण्याचे आणि जळोद ते अंबरीश टेकडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची पाण्याचे पाईप लाईन वरील एअर व्हॉल्व पाईप बदलविण्याचे कामे शनिवार दिनांक ७ रोजी महाराष्ट्र वीज वितरण कं. मर्या यांच्या कडील वीज पुरवठा मोठ्या प्रमाणात बंद असल्याने सदरचे कामे युद्ध पातळीवर नगरपरिषदेने हाती घेतलेले आहे.

तरी सदर काम करणेकामी शनिवार दिनांक ७ रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ७ वा. पर्यन्त पाणी उपसा यंत्रणा बंद ठेवावी लागणार आहे. त्यामुळे अमळनेर शहरातील होणाऱ्या पिण्याचे पाण्याचे वितरण एक दिवस उशिराने होईल, यांची नागरिकांनी नोंद घ्यावी. अमळनेर नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे.




