
जळगाव येथील उपोषणास अमळनेर येथील राजपुत एकता मंच देणार पाठिंबा…
अमळनेर:- राजपूत भामटा जातीच्या प्रमाणपत्रासाठी अमळनेर तालुका राजपुत एकता मंचने सोमवार दि ९ रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून जळगाव येथील उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सदर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

याबाबत अमळनेर प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून त्यात नमूद केले आहे की, भामटा राजपुत या जातीचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत जळगाव येथे मागील पाच दिवसांपासुन लाक्षणिक उपोषण जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर सुरु आहे,मात्र प्रशासनातर्फे अजून कुणीही त्यांची भेट घेण्यासाठी गेले नाही, तसेच मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन अनेक दिवस उलटले तरीही शासन अजून काही निर्णय घ्यायला तयार नाहीत.तरी अमळनेर तालुक्यात ग्रामीण व शहरी भागातील राजपुत समाजास भामटा राजपुत या जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने आणि जळगांव येथे सुरु असलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी दिनांक ०९ सोमवार रोजी सकाळी १०:३० ते ६:०० वाजेपर्यत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयसमोर राजपुत समाजाचे कार्यकर्ते व समाजातील नागरीक लाक्षणिक उपोषण करणार आहेत, असे राजपूत एकता मंचने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.




