
लायन्स क्लबकडून आयोजन, कर्मचाऱ्यांसह प्रवाशांनी घेतला लाभ…
अमळनेर:- येथील लायन्स क्लबकडून अमळनेर बस स्थानकावर आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांसह प्रवाशांनी तपासणी करून घेतली.

दिनांक १० रोजी अमळनेर येथील बस स्थानकावर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.मंजिरी कुलकर्णी, डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. संदीप जोशी यांनी कर्मचारी व प्रवाशांची आरोग्य तपासणी केली. यावेळी लायन्स क्लबचे पदाधिकारी राजेश लोढा, दिलीप गांधी, अनिल रायसोनी, पप्पू पहाडे, एलजी भरूचा आदी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी आगार व्यवस्थापक इम्रान खान पठाण, तुषार साळुंके, दीपक बोरसे, सतीश काळोसे यांचे सहकार्य लाभले. जवळपास दीडशे लाभार्थ्यांनी सदर आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.




