
अमळनेर:- येथील न्यू प्लॉट भागातील शिवाजी उद्यान परिसरात यंदा न्यू प्लॉट परिसर विकास मंचच्या वतीने नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून नवरात्रउत्सव मंडळाची कार्यकारिणी मंचचे अध्यक्ष चेतन राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली.

यावेळी नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी प्रणित जितेंद्र झाबक,उपाध्यक्षपदी विशाल राजेश खिलोसिया, प्रतीक विक्रम शाह,सेक्रेटरी केयुर ठक्कर तर खजिनदार पदी योगेश रमेश पवार यांची निवड करण्यात आली. सदर बैठकीत सर्व सदस्य उपस्थित होते.दरम्यान न्यू प्लॉट सह आजूबाजूच्या परिसरातील महिला भगिनी आणि युवतींसाठी सदरचे आयोजन न्यू प्लॉट विकास मंचने केले असून याठिकाणी संपूर्ण नऊ दिवस दांडिया, रास गरबा,विविध स्पर्धा सह दररोज आरती व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.तरी परिसरातील महिला भगिनी आणि युवक युवतींनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन नवरात्रोत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.




