
अमळनेर:- तालुक्यातील गडखांब येथील सरपंचपदी नितीन बापूराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

काल दिनांक १३ रोजी सरपंच पदाची निवड पार पडली. यावेळी नितीन पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सुरेश उत्तम पाटील, दीपक बिऱ्हाडे, शांताराम हिंमतराव पाटील, महादू भिल, सुनिता राजेंद्र बोरसे, अनिता रमेश बोडरे, संगीता राजेंद्र सैंदाणे, योगिता विनोद पाटील, नकुजबाई दिलीप पाटील, आशाबाई यशवंत पाटील, ग्रामविस्तार अधिकारी जितेंद्र बोरसे हजर होते. निवडणूक अधिकारी म्हणून विठ्ठल पाटील व व तलाठी प्रथमेश पिंगळे यांचे सहकार्य लाभले. यावेळी गावातील बापूराव पाटील, मगन पाटील, धनराज पाटील, सुभाष पाटील, बारकू पाटील, मधुकर पाटील, लीलाधर पाटील, रमेश सैंदाणे, व्ही टी बोरसे, राजमल बोरसे, आर डी बोरसे, भानुदास पाटील, रमेश बोडरे, चतुर पाटील, सुभाष बोरसे, नथू पाटील, मधुकर पाटील, दिलीप पाटील, डॉ रमेश पिंगळे, संतोष पाटील, रमेश नेरकर, भैय्या पाटील, नाना नथू पाटील, रंगराव बोरसे, पांडुरंग चतुर पाटील, श्यामकांत बोडरे, कैलास पाटील, गुलाब पाटील, राजेंद्र सैंदाणे, रतिलाल वाघ, जंगलाल पारधी, काशिनाथ पारधी, रावसाहेब पाटील, यशवंत पाटील, सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते.

