
बीडीओ सोनवणे यांचे क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरणप्रसंगी आवाहन…
अमळनेर:- जीवनाच्या स्पर्धेतही खिलाडू वृत्ती जोपासली तर जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही यासाठी शेवटपर्यंत खेळाडू वृत्ती अंगी बाळगा असे आवाहन गट विकास अधिकारी एस टी सोनवणे (शिरपूर) यांनी केले. माजी नगराध्यक्ष स्व. भास्करराव तापीराम चव्हाण यांच्या २३ व्या स्मृतिप्रित्यर्थ प्रा.डॉ.एस.ओ.माळी आणि प्रतापियन्स परिवारातर्फे विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. बक्षीस वितरण प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य डॉ. एस ओ माळी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बाजार समितीचे माजी तज्ञ संचालक डी ए धनगर, शिवशाही फाउंडेशनचे जयेशकुमार काटे, प्रतापियन्स प्रेरणा प्रबोधिनीचे संचालक उमेश काटे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दरम्यान सकाळी जी.एस हायस्कूल मध्ये खानदेश शिक्षण मंडळाचे माजी कार्याध्यक्ष हरी भिका वाणी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी खो-खो, कबड्डी, १०० मीटर धावणे, रस्सीखेच, टेनिक्वांईट आदी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तालुका क्रीडा संयोजक एस पी वाघ, क्रीडा शिक्षक के आर बाविस्कर, पी आर भावसार यांनी पंच म्हणून काम केले. सुनील वाघ यांनी सूत्रसंचालन केले.
विविध क्रीडा स्पर्धेचा निकाल…
१०० मी धावणे-
प्रथम- मुकेश बाविस्कर, व्दितीय-कृष्णा महाजन, तृतिय- रक्षक गोसावी, उत्तेजनार्थ- यश बडगुजर
रिंग टेनिस
प्रथम- रेहान जाकिर शेख ,व्दितीय- मेहुल चौधरी, तृतिय- नरेश सोनवणे , उत्तेजनार्थ- अमोल अहिरे.
रस्सीखेच
(मोठा गट) प्रथम- गितेश बाविस्कर , व्दितीय- गौरव महाजन, तृतिय- शुभम वारुळे.
(लहान गट) प्रथम- हितेश पाटिल, व्दितीय- नैतिक सोनार, तृतिय-प्रिन्स पवार.
कबड्डी– प्रथम- फ्रेडंस कबड्डी क्लब कर्णधार (जयेश पाटील), व्दितीय, जी एस क्रीडा प्रबोधनी (कर्णधार- दिनेश पाटील), तृतिय- जी एस हायस्कुल (कर्णधार यश पाटील)
खो खो
प्रथम- जी एस क्रीडा प्रबोधनी, व्दितीय- प्रताप कॉलेज, अमळनेर, तृतिय- जी एस हायस्कुल, अमळनेर
स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणुन गिरीश रौंदळे(खो खो), दिनेश पाटील (कबड्डी), रेहान शेख (रिंग टेनिस) सचिन पावरा यांचा विशेष सन्मान करण्यात आला.




